Pune Bye-Election : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून केला अर्ज दाखल

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील पुणे (Pune Bye-Election) जिल्ह्यातील कसबा पेठ विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी अर्ज दाखल केले.

याशिवाय भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी पुण्यातील चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

Maharashtra : बाळासाहेब थोरात यांनी दिला विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी (Pune Bye-Election) राज्यातील राजकीय परंपरेचा आदर करावा, अशी विनंती आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांना केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले होते, तरीही अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता उरली नाही,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.