Pune Bye-Election : कसब्यातून बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी, उमेदवारी अर्ज केला दाखल

एमपीसी न्यूज : माझा कुठे पक्षाने विचार केला, तेव्हा मी पक्षाचा विचार का करू, असं मत  कसब्यातून बंडखोरी करणारे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर (Pune Bye-Election) यांनी व्यक्त केलं आहे. कसब्यातून महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

बाळासाहेब दाभेकर म्हणाले की, मी बंडखोरी करणार असं माहित झाल्यावर कॉंग्रेसचे नेते माझ्याकडे समजवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मला पक्षाचा विचार करण्याला सल्ला दिला. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं की पक्षाने माझा विचार केला नाही तर मी पक्षाचा विचार का करु. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. काहीही झालं तरी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. मी चाळीस वर्ष पक्षाचं काम करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Pimpri News : सुरक्षा रक्षकाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

आजवर काँग्रेस पक्षाने अन्याय केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडणुकीत मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज भाजपाकडून हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. (Pune Bye-Election) त्यानंतर आज केसरीवाडा येथून कॉंग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर हे असंख्य कार्यकर्त्यांसह रॅली काढत.गणेश कला क्रिडा रंगमंच येथे अर्ज दाखल करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.