Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘सीए’ परीक्षा पुढे ढकलली

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनदी लेखापाल (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्यात होणारी ही परिक्षा आता जून-जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

‘आयसीएआय’कडून मे महिन्यात परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सीए परीक्षा लांबणीवर पडली आहे. २ मे ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या फौंडेशन कोर्स (नवीन अभ्यासक्रम), इंटरमीजीएट कोर्स (नवा व जुना अभ्यासक्रम), फायनल कोर्स (जुना व नवा अभ्यासक्रम), इंटरनॅशनल ट्रेड लॉ अँड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन या सर्व परीक्षा आता २० जून ते ३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहेत.

अधिक माहितीसाठी ‘आयसीएआय’चे संकेतस्थळ किंवा पुणे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन ‘आयसीएआय’ पुणेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.