_MPC_DIR_MPU_III

Pune : कोरोनाच्या संकट काळात आमदार, खासदारांना फोन करा : अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना आदेश

Call MLAs, MPs during Corona crisis: Ajit Pawar orders officials

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना मी रोज सकाळी सात वाजता चार अधिकाऱ्यांना फोन करून आढावा घेतो. त्याच प्रकारे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी रोज आमदार, खासदारांना फोन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मला यापुढे तक्रार नको, एकत्रितपणे काम करा, असेही त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_IV

दरम्यान, शरद पवार यांच्या समोरच अजित पवार यांनी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे तोंडभरून कौतुक केले. कोरोना संकट काळात महापौर हे चांगले काम करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मैदानात उतरले आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकट काळात पुणे महापालिका चांगले काम करीत आहे. मोठा आर्थिक भारही उचलत आहे. पुणे महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता आहे. तरीही अजित पवार यांनी आज शरद पवार यांच्या समोर महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केल्याने उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधीमध्ये खमंग चर्चांना उत आला होता.

एरव्ही अजित पवार रोखठोक म्हणून ओळखले जातात. आज मात्र त्यांच्या या स्वभावाची वेगळीच झलक पहावयास मिळाली. पुणे शहरात 14 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण गेले आहेत. तर, 558 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. त्याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी शरद पवार यांना दिली

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.