Pune: कोरोनाच्या पाश्वभूमीवर वीज दरवाढ रद्द करा- श्वेता गलांडे

Pune: Cancel power tariff hike on the backdrop of Corona demand by Shweta Galande कोरोना महामारीमुळे 20 मार्चपासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदीची लाट आली आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पाश्वभूमीवर वीजदर वाढ तातडीने रद्द करा, अशी मागणी नगरसेविका श्वेता गलांडे-खोसे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

कोरोना महामारीमुळे 20 मार्चपासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदीची लाट आली आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.

अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. नागरिकांचे खाण्याचे हाल झाले आहेत. या परिस्थितीमध्ये महावितरणने 1 एप्रिलपासून वीज दरवाढ केली. त्यापूर्वी स्थिर आकार दरमहा ९० रुपये होता. तो १०० रुपये झाला. वहन आकार १.२८ रु. प्रति युनिट होता, तो १.४५ रु. प्रति युनिट झाला.

वीज आकार पहिल्या १०० युनिटससाठी ३.०५ रु. प्रति युनिट होता. तो ३.४६ रु. प्रति युनिट केला. १०० युनिटसच्या पुढील १०१ ते ३०० युनिटस पर्यंतचा दर पूर्वी ६.९५ रु. प्रति युनिट होता, तो आता ७.४३ रुपये प्रति युनिट झाला.

३०० युनिट्सच्या पुढील ३०१ ते ५०० युनिटस पर्यंतचा दर पूर्वी ९.९० रुपये प्रति युनिट होता, तो १०.३२ रुपये प्रति युनिट झाला आहे. एकूण वाढ १०० युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी १६% आहे व १०० युनिटसच्या वरील ग्राहकांसाठी सरासरी दरवाढ १३% आहे. या दरवाढीमुळे नागरीकांची वीज बिले वाढली आहे.

कोरनामुळे खाण्याची भ्रांत असणा-या वीज दरवाढीचा शॉक लागत आहे. नागरिकांनी खायचे की वीज बिल भरायची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्याची परिस्थिती लक्षात उर्जा मंत्री यांनी वीज दरवाढ रद्द करावी.

तसेच, लॉकडाऊनच्या काळात स्थिर आकार रद्द केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असेही श्वेता गलांडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.