Pune : पी.एम.पी बस डेपोमध्ये कार पार्क करून पोलिसांशी हुज्जत घळणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – डेपोमध्ये कार पार्क करून पोलिसाशी हुज्जत घळणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.8) रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज चौकी समोरील पी.एम.पी बस डेपो समोर घडली.

पप्पू ऊर्फ कमलाकर बापूराव भंडारी (वय 29,रा. बालाजीनगर,धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी भोलेनाथ अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पप्पू भंडारी याने कात्रज चौकीसमोर पीएमटी डेपो येथे त्याची त्‍याची फॉर्च्युनर कार लावली होती.
त्यामुळे डेपो मध्ये येणाऱ्या बस पार्किंग करण्यासाठी अडचण झाल्यामुळे येथील परिसरात अडथळा निर्माण होऊ लागला. दरम्यान फिर्यादी यांनी त्याची कारबाजूला घेण्याची विनंती केली. परंतु त्याने त्यांच्या अंगावर धावून गेला आणि या वादादरम्यान त्याने त्याची फॉर्च्युनर कार डेपोमधून कोणालाही न सांगता नेली . याप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.