BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे मोटार शोमध्ये पुणेकरांना विविध ब्रॅण्ड्सच्या मोटार पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज – खास वाहनप्रेमींसाठी ‘पुणे मोटार शो २०१९’ हे जागतिक दर्जाचे दुचाकी, चारचाकी वाहनांचे प्रदर्शन पुण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २० ते रविवार, दि. २२ सप्टेंबर २०१९ दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे भरविण्यात येणार आहे.

या निमित्ताने चारचाकी, दुचाकीचे विविध ब्रँडस्, प्रात्यक्षिके, ऑटो अॅक्सेसरीज् एकाच छताखाली पाहण्याची तसेच त्याविषयी माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकरांना एकाच छताखाली मिळणार आहे. हे प्रदर्शन हे सशुल्क असून त्यासाठी जागेवर अथवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन देखील करता येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3