Pune : वारजे येथे भरधाव ट्रकची कारला धडक ; कारचालक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- भरधाव ट्रकने समोरून निघालेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारचालक गंभीररीत्या जखमी झाला. हा अपघात आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान देहुरोड – कात्रज बायपास रस्त्यावर वारजे येथे घडला.

देहुरोड – कात्रज बायपास रस्त्यावर साताऱ्याला जाणाऱ्या लेनवर (एम एच 12 क्यू एम 5299) कारला भरधाव निघालेल्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून कारचालक गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

क्रेनच्या साहाय्याने कार बाजूला घेतल्यानंतर एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.