Pune : केस स्टडी डेव्हलपमेंट अँड रायटिंग ‘ विषयावरील कार्यक्रमाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) आयोजित ‘केस स्टडी डेव्हलपमेंट अँड रायटिंग ‘ विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला चांगला प्रतिसाद मिळाला.

‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) च्या पौड रस्त्यावरील कॅम्पस मध्ये गुरुवारी (दि. २७) हा कार्यक्रम झाला . ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले . विषयतज्ज्ञ डॉ शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले. डॉ सचिन आयरेकर, डॉ प्रमोद पवार, डॉ सुचेता कांची यांनी संयोजन केले. रजिता दीक्षित यांनी आभार मानले.या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये २५ जण सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.