BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुण्यातून पावणेतीन लाखाची रोकड जप्त

निवडणूक आयोगाच्या स्थिरस्थावर पथकाची कारवाई

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिरस्थावर पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास गुलटेकडी येथील सॅलिसबरी पार्क परिसरातून पावणेतीन लाखाची रोकड जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके आणि यंत्रणा वाहनांची तपासणी करीत असताना ही रक्कम सापडली. मागच्या आठवड्यात एका तेल व्यावसायिकाकडून 20 लाखाची रक्कम जप्त केली होती.

स्थिरस्थावर पथकाचे कर्मचारी गुलटेकडी परिसरात नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एक चारचाकी गाडीच्या तपासणीदरम्यान त्यांना ही रोकड आढळली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नेमलेल्या पथकाकडून मद्य, पैसे, साहित्य वाटपाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे. अशाप्रकारे निवडणुका लागल्यापासून रोकड पकडण्यात आल्याची ही पुण्यातील दुसरी घटना आहे. ही रक्कम सध्या स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.