Pune : कॅटलिस्टने साकारली अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट

एमपीसी न्यूज – कॅटलिस्ट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट साकारली आहे. याचे लोकार्पण उद्या ( दि. 1 ऑगस्ट रोजी ) होत आहे. 

संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते तर प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्त (दि.1 ऑगस्ट) उद्या सकाळी 10.00 वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये [email protected]/catalystfoundation19 या लिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.

साहित्यिक म्हणून अण्णाभाऊंचे योगदान अतुलनीय होतेच मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ही त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते. अण्णाभाऊंचा जीवनपट उलगडून दाखवणारी तसेच त्यांच्या विपुल कार्याविषयी माहिती देणारी ही पहिली वेबसाईट अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने साकारण्यात आली आहे.

महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळांचे प्रकाशित केलेले साहित्यही या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून एका क्लिकवर अण्णाभाऊंविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. यातील माहिती सातत्याने अपडेट होत राहणार असल्याने संशोधकांना याचा फायदा होणार आहे. या उपक्रमाद्वारे अनोख्या पद्धतीने आम्ही अण्णाभाऊंना आदरांजली अर्पण करत आहोत, असेही माने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.