BNR-HDR-TOP-Mobile

Pune : केटरिंग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटित व्हा- सरपोतदार

पुणे जिल्ह्यातील केटरर्सच्या महामेळाव्याला चांगला प्रतिसाद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- ‘केटरिंग क्षेत्रातील सरकार दरबारपासून सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आणि एकत्रितरित्या प्रगतीच्या संधी शोधण्यासाठी आउटडोअर केटरिंग क्षेत्रातील सर्वानी संघटित होण्याची आवश्यकता आहे ‘असे प्रतिपादन महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी केले.

‘न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘चा महामेळावा पुण्यात 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल ताज विवांता (ब्लू डायमंड ) येथे झाला . ‘महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन’चे अध्यक्ष किशोर सरपोतदार हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष जी.एस.बिंद्रा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी’न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘अध्यक्ष मन्साराम माळी ,उपाध्यक्ष बाबूसिंह पुरोहित,उपाध्यक्ष बाबुलाल गौड,सनी अवसरमल ,मनोज वैष्णव,एम.क्यू सईद,दिनेश्वर नाथानी ,सुहास आदमाने उपस्थित होते.

किशोर सरपोतदार म्हणाले,’भारतभरातून 4 पिढ्या केटरिंग क्षेत्रात व्यवसाय करायला पुण्यात आल्या आहेत.हा व्यवसाय आव्हानात्मक होत आहे.ग्राहकांच्या आवडी ,निवडी ,गरजा ,बजेट बदलत आहेत ,सरकारी नियम बदलत आहेत.अशावेळी संघटित होऊन प्रश्न सोडविणे आणि संघटितपणे प्रगतीच्या संधी शोधणे आवश्यक आहे. ‘सणासुदीलाही दुसऱ्याना सेवा देणाऱ्या केटरर्स मंडळींनी आरोग्य जपावे,स्वतःसाठी वेळ काढावा’,असे आवाहनही त्यांनी केले.

जी.एस.बिंद्रा यांनी’संघटनशक्तीचे फायदे’या विषयावर मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात केटरिंग क्षेत्रातील करियरसाठी ,जीएसटी विषयक उपयुक्त ठरणारी दोन व्याख्यानेही झाली.एस.आर.भार्गव यांनी जीएसटी कर प्रणालीची माहिती दिली ,तर दिनेश्वर नाथानी यांनी प्रेरक व्याख्यान दिले.ऑल इंडिया हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे अध्यक्ष सनी अवसरमल यांनी केटरिंग असोसिएशनसाठी आवश्यक विमा योजनांविषयी माहिती दिली.

संयोजन समितीच्या वतीने मन्साराम माळी,बाबूसिंह पुरोहित,बाबुलाल गौड,काळुराम गेहलोत ,दलपतसिंह पुरोहित ,मनोज वैष्णव यांनी स्वागत केले.महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले. अन्नपूर्णा माता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पुणे जिल्ह्यातील केटरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांनी (आउट डोअर ) एका छत्राखाली यावे,या उद्देशाने हा महामेळावा घेण्यात आला. जीएसटी कर प्रणालीतील प्रश्न ,एफडीए चे नियम समजावून सांगणे ,सरकारदरबारी व्यावसायिकांच्या समस्या मांडणे,समाजात या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नवनवे उपक्रम आयोजित करणे ,यासाठी ही असोसिएशन उपक्रम आयोजित करणार आहे,असे यावेळी संयोजकांनी सांगितले.

भारतभरातून,गुजराथी,राजस्थानी,पंजाबी,दक्षिणी, बंगाली,सिंधी,पारशी अशा विविध प्रांतातील नागरिक पुण्यात गेल्या 100 हुन अधिक वर्षे वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्या पद्धतीचे भोजन बनविणारे महाराज येथे आले व कालांतराने त्यांनी त्यांच्या केटरिंगच्या फर्म्स सुरू केल्या, आता या केटरर्स च्या जवळजवळ चौथ्या पिढीनेही पुण्यात या व्यवसायात प्रगती करण्यास सुरुवात केली आहे,असे यावेळी सांगण्यात आले.

HB_POST_END_FTR-A4

.