Pune: रुग्णालये, प्रसुतिगृहांच्या इमारतीमध्ये बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे; प्रस्तावाला पुणे मनपाच्या स्थायी समितीची मंजुरी

एमपीसी न्यूज – सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून महापालिकेचे विविध दवाखने, रुग्णालये आणि प्रसुतिगृहांच्या इमारतीमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहरातील गरीब व गरजू नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात दवाखने, रुग्णालये आणि प्रसुतिगृहांची निर्मिती केली आहे. या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणुक केली जाते. मात्र, अपुर्‍या मनुष्यबळामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येतो.

या पार्श्वभूमीवर पालिकेचे सर्व दवाखने, रुग्णालये आणि प्रसुतीगृहांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी राबविण्यात आलेल्या निवीदा प्रक्रीयेमध्ये एकून सहा ठेकेदारींनी निवीदा भरून सहभाग घेतला होता.

यामध्ये सर्वातच कमी दराने निवीदा भरलेल्या मे. राही सिस्टिम्स प्रा. लि. यांना सीसीटिव्ही बसविण्याचे काम देण्यात येणार आहे. या ठेकेदाराकडून हे काम 40 लाखापर्यंत करून घेण्यास आणि त्यासंबंधी त्यांच्याशी करारनामा करण्यास परवानगी मागणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायीने बुधवारी मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.