Pune : यंदा आंब्याशिवाय अक्षय तृतीया साजरी ; मुहूर्त असूनसुद्धा सोने, घर, वाहन खरेदी नाही

पुणेकरांची झाली निराशा

एमपीसी न्यूज – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने, वाहन, घर, आंबा खरेदी केली जाते. यंदा मात्र कोरोनाचा संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये खरेदीला मुरड घालावी लागली. त्याचबरोबर बहुतांश पुणेकरांना यंदा आंब्याशिवाय हा सण साजरा करावा लागला. त्यामुळे पुणेकरांची घोर निराशा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पुणे महापालिकेतर्फे संपूर्ण पुणे शहराची सीमा सील करण्यात आली आहे. त्याची कडक अंमलबजावणीही करण्यात येत आहे. जागोजागी पोलीस उभे असल्याने पुणेकरांना बाहेर पडणे अवघड झाले आहे.

त्यामुळे पहिल्यांदाच अक्षय तृतीयाच्या शुभमुर्हूर्तावर सोन खरेदीचे समीकरण तुटले. घरांचीही विक्री होऊ शकली नाही. शोरूमला टाळे असल्याने वाहन खरेदीही रखडली. दुसरीकडे ऑनलाइन नोंदणी करून आंबा खरेदी करण्यात आली. आज काही लोक आंबा खरेदीला बाहेर पडत होते. सकाळी 10 ते 12 ही वेळ ठरवून देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना आंबा खरेदी करता आला नाही. 700 ते 1200 रुपये पेटीला भाव होता, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, तेवढ्या प्रमाणात तयार आंबा नाही. त्यामुळे पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली.

काही व्यापाऱ्यांकडे कोकणचा हापूस आंबा आहे. एरवी बाजारात अक्षय तृतीयेला 200 ते 300 पेट्या असतात. सध्या, तिथे 25 च पेट्या आहेत. दरम्यान, आर्थिक मंदी पाठोपाठ आता कोरोनाचे महाभयंकर संकट बांधकाम क्षेत्रातही आले आहे. त्यामुळे व्यवयसायिकांना घरांच्या किमती कमी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.