_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune: प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने वारजे-माळवाडी येथे आनंदोत्सव

Pune: Celebration on the occasion of Bhumi Pujan ceremony of Lord Shriram Temple नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेऊन प्रभू श्रीरामांचे पूजन करुन दर्शन घेतले. याप्रसंगी पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक असा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.5) पार पडला. याचा आनंदोत्सव देशांतील कानाकोपऱ्यात साजरा करण्यात आला. वारजे – माळवाडी भागातसुद्धा भाजपच्या वतीने प्रभू श्रीरामांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक बबनराव सकट व विलास जोशी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेऊन प्रभू श्रीरामांचे पूजन करुन दर्शन घेतले. याप्रसंगी पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वारजे नगर संघचालक चित्तरंजन भागवत आणि प्रांत मंडळ सदस्य बाळासाहेब दळवी, यशवंतराव ववले, नगर कार्यवाह विद्याधर जोशी, सहकार्यवाह ऋषिकेश राऊत, सामाजिक कार्येकर्ते सचिन वांजळे, श्रीकांत निरगुडे, रामभाऊ मारणे, अशोक ऊनकुले, अशोक नरसाळे, प्रसाद कफने, निलेश देशमाने उपस्थित होते. माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

घरावर विद्युत रोषणाई केल्याने दिवाळीसारखे वातावरण तयार झाले होते. सकाळपासूनच किरण बारटक्के यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून शेकडो नागरिकांनी दर्शन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.