Pune : चीनच्या मुजोरीला केंद्र सरकारने सडेतोड उत्तर द्यावे : रमेश बागवे

Central government should give unequivocal answer to China's : Ramesh Bagwe

काँग्रेस भवन येथे ‘शी जिनपिंग’ यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध

एमपीसी न्यूज – चीन सरकार कायमच भारत विरोधी भूमिका घेत आले आहे. काँग्रेस राजवटीत देखील हीच भूमिका चीनची होती. त्यावेळी स्व. इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी चीनला जशासतसे उत्तर दिले होते. परंतु, आज भारतीय जवान सीमेवर शहीद होऊन देखील देशाचे पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत. चीनच्या या मुजोरीला केंद्र सरकारने सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली.

काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी काँग्रेस भवन येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी चीन विरोधात घोषणाही देण्यात आल्या.

भारत – चीन सीमेवरील गलवान घाट येथील शहीद जवानांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

या आंदोलनात माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, राजेंद्र शिरसाट, सुनील शिंदे, सचिन आडेकर, मेहबूब नदाफ, क्लेमेंट लाजरस, विठ्ठल गायकवाड, मनोज कांबळे, राजू गायकवाड, रोहित अवचिते यांनी सहभाग घेतला होता.

रमेश बागवे म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत खरेदी केलेलया बोफोर्स तोफा आणि तेजस विमानेच आज कारगिल युद्धाप्रमाणे भारत – चीन सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी तैनात केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.