Pune : केंद्रीय विद्याल, प्रोडिगी स्कूलची आगेकूच

एमपीसी न्यूज – केंद्रीय विद्यालय आर्मी एरिया आणि प्रोडिगी पब्लिक स्कूल यांनी रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्ट्स फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आगेकूच केली.

डेनोबिल्ली कॉलेज ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या गटातील दुस-या फेरीत केंद्रिय विद्यालयाने पुणे इंटरनॅशन​​ल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजवर ४-१ ने विजय मिळवला. यात अथर्व मानेने (१७, १८ मि.) दोन गोल केले, तर आर्श खान (१० मि.), दिपांश टंडन (१२ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून आरुष रावतने (४० मि.) एकमेव गोल केला.

यानंतर प्रोडिगी पब्लिक स्कूलने सरदार दस्तूर होरमाझदियार को एज्युकेशन हायस्कूलवर २-१ने मात केली. यात प्रोडिगी स्कूलकडून ऋतुराज गायकवाडने (३, ४२ मि.) दोन गोल केले, तर पराभूत संघाकडून अनिश जोशीने (४८ मि.) एकमेव गोल केला.

निकाल – डेनोबिल्ली कॉलेज ग्राउंड – दुसरी फेरी – ज्युनियर मुले – १) केंद्रिय विद्यालय आर्मी एरिया – ४ (आर्श खान १० मि., दिपांश टंडन १२ मि., अथर्व माने १७, १८ मि.) वि. वि. पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज – १ (आरुष रावत ४० मि.).

२) प्रोडिगी पब्लिक स्कूल – २ (ऋतुराज गायकवाड ३, ४२ मि.) वि. वि. सरदार दस्तूर हायस्कूल – १ (अनिश जोशी ४८ मि.).

पहिली फेरी – वरिष्ठ मुले – १) पुज्य कस्तुरबा गांधी – १ (४) (प्रथम यादव ४८ मि., अमृत यादव, साहिल शेख, जतिन गुप्ता, अनिकेत ए.) वि. वि. (शूटआउटमध्ये) सेंट जोसेफ हायस्कूल – १ (३) (ए. डॅनिएल ६, ब्रायन अँथनी, मेल्विन फालेरो, आदित्य सोनवणे)

२) द बिशप्स स्कूल – १ (शिवा पांडे ३ मि.) वि. वि. अऱिहंत कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स – ०.

३) द रेवाचंद भोजवानी अकॅडमी – २ (मिहीर तुपे ५० मि., सिद्धेश्वर पवार ५५ मि.) वि. वि. सेंट व्हिन्सेंट नाइट कॉलेज ऑफ कॉमर्स – १ (निमेश बाफना ७ मि.)

हेडगेवार ग्राउंड, पीसीएमसी

पहिली फेरी – ज्युनियर मुले – १) प्रियदर्शनी स्कूल सीबीएससी – ६ (रोहित शर्मा १, १२, ३२, ३६, ४० मि., विवेक जयचंद्रन १७ मि.) वि. वि. जडसन हायस्कूल – ०.

२) द न्यू मिलेनियम स्कूल – ४ (सार्थक कुरूमकर ६, ८, २९ मि., हर्षल कांडगे ३५ मि.) वि. वि. गीतामाता इंग्लिश मीडियम- ०.

३)एसएनबीपी स्कूल, रहाटनी – ८ (भावेश चौधरी १ मि., निशिल पवार ३, १०, १२, ३२, ३५ मि., रोहन राजेश ३८ मि., साई मंगेश ४० मि.) वि. वि. कॅम्ब्रिज स्कूल -०.

वरिष्ठ मुले – सीएमएस इंग्लिश मीडियम स्कूल – ६ (प्रथमेश सावंत ४, ८, ३१, ३२, ३८ मि., वरुण प्रसन्न ४४ मि.) वि. वि. एसएनबीपी, रहाटनी – ०

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.