Pune : पुणे विभागात ‘कोरोना’चे शतक; 101 रुग्ण पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आज, शुक्रवारी (दि. 3) सायंकाळ अखेर 101 झाली आहे. त्यामध्ये पुणे 57, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी ही विभागणी असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. गुरुवारी दुपारपर्यंत पुणे विभागातील ही संख्या 80 होती.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 2 हजार 18 होते. त्यापैकी 1 हजार 878 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. 140 नामुन्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालापैकी 1 हजार 777 नमुने निगेटीव्ह असून 101 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे.

विभागामधील 8 हजार 178 प्रवाशांपैकी 3 हजार 996 प्रवाशांबाबत प्रशासनाचा फॉलोअप सुरू आहे. अन्य 4 हजार 282 प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 15 लाख 61 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 72 लाख 87 हजार 291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

रुग्णालयाबाबत बोलतांना विभागीय आयुक्त म्हणाले, पुणे विभागात एकूण 88 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 12 हजार 848 बेडस उपलब्ध आहेत. तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

या ठिकाणी एकूण 2 हजार 167 बेडस उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क 49 हजार 845, ट्रिपल लेअर मास्क 4 लाख 69 हजार 194 एवढे उपलब्ध आहेत. 3 हजार 781 पीपीई किट तसेच 12 हजार 944 सॅनीटायझर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.