Pune :  पुण्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज –  पुणे व परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने (Pune ) वर्तवली आहे. बुधवार ते शुक्रवार (दि.7 ते 9 ) अशीच स्थिती कायम राहणार आहे असेही हवामान खात्याने सांगितले आहे.

ढगाळ वातावरणव, मध्ये –मध्ये येणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे तापमान हे 36 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती राहणार असून दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.

Shirur : अल्पवयीन मुलांची बाईक राईड बेतली जीवावर; दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू

राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 43.6  अंश सेल्सिअस इतकी झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. सध्या ईशान्य मध्य प्रदेशपासून विदर्भ ते तेलंगणा ते उत्तर कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर राज्यात उष्ण व दमट हवामान हवामान राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान हवामान खात्याने विजांपासून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून नागरिकांनी झाडांचा आसरा घेऊ नये, वादळात प्रवास कऱणे टाळा, विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असेल तर (Pune )मोबाईल इलेक्ट्रीक उपकरणे वापरणे टाळा अशा सूचना देखील केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.