Chandani chowk bridge : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दोन ऑक्टोबरला पाडण्यात येणार चांदणी चौकातील पूल

एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जुना पूल अखेर दोन ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याचे नियोजन, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, पूल पाडण्यासाठी लागणारा कालावधी, राडारोडा टाकण्याचे ठिकाण याबाबतचा सविस्तर अहवाल (Chandani chowk bridge) येत्या मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पूल पाडण्यासाठी घ्यावा लागणारा ब्लॉक, पर्यायी मार्ग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठीचे पुढील वेळापत्रक निश्चित करण्यात येईल.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत चांदणी चौक येथील पूल पाडण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Serial burglars arrested : घरफोडी करणाऱ्या तीन सराईतांना फरसखाना पोलिसांकडून अटक

या बैठकीत हा पूल दोन ऑक्टोबरला पाडण्याचे नियोजन असल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्या दिवशी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ब्लॉक घ्यावा लागणार असून, पर्यायी मार्गांबाबतची सर्व माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, चांदणी चौकातील हा पूल ब्लास्टिंगद्वारे पाडल्यानंतर रस्त्यावर पडणारा राडारोडा हटविणे आणि रस्ता वाहतुकीसाठी योग्य करणे,  (Chandani chowk bridge)ही कामे 12 तासांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन संबंधित यंत्रणांनी केले आहे. या कालावधीत महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबवली जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. तसेच यापूर्वी पर्यायी मार्गांची व्यवस्था काय असेल याबाबतही सांगण्यात आले होते. मात्र, पर्यायी मार्गांबाबत सर्व माहिती येत्या काही दिवसांत प्रसिद्ध केली जाणार आहे.

स्फोटकं लावण्याचं काम सुरु

काही दिवसांपूर्वीच हा पूल पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरु होती. या पूलाच्या खालच्या भागात मोठे होल्स करुन त्यात स्फोटकं लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. काही प्रमाणात हे काम पूर्ण झालं आहे. मात्र सेवावाहिन्यामुळे काही काम शिल्लक आहे. दोन दिवसांपूर्वी लहान पहिला ब्लास्ट करण्यात आला होता. त्याचा अंदाज घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूल पाडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. (Chandani chowk bridge)काही दिवसांपूर्वी नोएडा शहरातील ट्विन टॉवर जमीन दोस्त करण्यात आला होता. त्याच कंपनीला हा पूल पाडण्याचं काम देण्यात आलं आहे. Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. स्फोटानंतर अवघ्या आठ ते दहा सेकंदांमध्ये हा पूल जमीनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.