Pune News : केंद्रीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीची अल्पवयीन तरूणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील चंदन नगर परिसरातील केंद्रीय महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षे तरुणीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.(Pune News) तिच्याच वर्गात शिक्षण घेणारा एक तरुण सातत्याने तिचा पाठलाग करत होता. मैत्री करावी म्हणून जबरदस्ती करत होता.. या सर्वाला कंटाळून तिने ऑक्टोबर महिन्यात राहत्या घरात गळफास घेतला. विमानतळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण दोघेही चंदन नगर परिसरातील केंद्रीय महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. जुलै महिन्यापासून आरोपी तरुण या मुलीचा पाठलाग करत होता. या तरुणीच्या शाळेला येण्याजाण्याच्या रस्त्यावर तो सातत्याने थांबायचा. मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करून त्यांनी तिला त्रासही दिला होता. या सर्वाला कंटाळून मयत तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Pune News : दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान आरोपी मुलाने तिला कशाप्रकारे त्रास दिला हे सर्व निष्पन्न झाले.(Pune News) त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.