_MPC_DIR_MPU_III

Pune : कोथरूडमध्ये नाराज उमेदवारांची चंद्रकांतदादा पाटील घालणार समजूत; आज प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा

एमपीसी न्यूज – कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले आहेत. त्या सर्वांची समजूत पाटील घालणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज सायंकाळी महायुतीचे अधिकृत उमेदवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा आशिष गार्डन, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आल्याने त्या नाराज असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे त्या माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारीचे स्वागत करताना दिसून येत आहे. पाटील यांचा उमेदवारीमुळे कोथरूडचा विकास होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

_MPC_DIR_MPU_II

या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, अमोल बालवडकर प्रबळ इच्छुक होते.

या सर्वांची पाटील व्यक्तिशः समजूत घालून कामाला लागा, असे सांगणार असल्याचे पक्षाचा सूत्रांकडून सांगण्यात आले. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, महसूलमंत्री, राज्यातील क्रमांक 2 चे नेते आहेत.

पक्षाने आदेश दिला तर, आपण मुख्यमंत्री होणार असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे पाटील यांना विजयी करण्याची जबाबदारी सर्व भाजप नगरसेवक, आमदार, कार्यकर्त्यांची आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.