_MPC_DIR_MPU_III

Pune : चंद्रकांतने काढली चंद्रकांतची समजूत

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची समजूत काढून त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून घेतले.

_MPC_DIR_MPU_IV

चंद्रकांत पाटील यांनी सकाळीच ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कोथरूडच्या शिवाजी पुतळा चौकात कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅलीला सुरुवात झाली. पाटील पाणी महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.

मी पुण्याचा जावई आहे. मुंबई बरोबर पुणे वाढत असून मी पुण्याचे अनेक प्रश्न सोडविले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. तुम्ही मला सहकार्य करा, असे आवाहन पाटील यांनी चंद्रकांत मोकाटे यांची समजूत घालताना केले. त्यानंतर मोकाटे हे चंद्रकांत पाटील यांच्या रॅलीत सहभागी झाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.