_MPC_DIR_MPU_III

Pune : चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा

पाटील यांना कसबा मतदारसंघात दगाफटका होण्याची भीती ?

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. वास्तविक कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास पाटील उत्सुक होते. परंतु बापट खासदार झाल्यामुळे या मतदारसंघात इच्छुक नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची पाटील यांनी भीती असल्याने त्यांनी कोथरूड मतदारसंघ निवडला असल्याची चर्चा रंगली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुरुवातीला कसबा मतदारसंघात इच्छुक होते. तशी त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, या मतदारसंघात खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व आहे. बापट तब्बल 25 वर्ष आमदार राहिले. ते खासदार झाल्याने हा मतदारसंघ मोकळा झाला आहे. त्यामुळे पाटील यांनी या मतदारसंघाची निवड केली होती.

_MPC_DIR_MPU_II

पण या मतदारसंघात इच्छुक नगरसेवकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची पाटील यांनी भीती असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केल्याचे बोलले जात आहे. पण, या मतदारसंघातून विजय मिळविणे तसा सोपा नाही. विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ प्रबळ दावेदार असताना बाहेरचा उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक, स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर, नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने इच्छुक आहेत. चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून बापट गटाचा नगरसेवकांनी बैठकांना दांडी मारणे सुरू केले होते. त्याचा व्यवस्थित अभ्यास पाटील यांनी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांची जनतेमधून निवडणूक लढविण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते कधीच निवडणूक लढवून विजयी झाले नाहीत, अशी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.