Pune : चंद्रकांत पाटील यांची श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले यांनी पाटील यांचे औंक्षण केले. भिमाले परिवाराच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ, शाल, पुणेरी पगडी देऊन पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

श्रीनाथ भिमाले आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली. यावेळी प्रसाद भिमाले, अभिषेक भिमाले उपस्थित होते. दरम्यान, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भिमाले यांनी जवळपास 3 वर्षे सभागृह नेतेपदाचा कार्यभार पहिला. या दरम्यान त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.