Pune : चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण पुण्यात 4 वाजेपर्यंत पोहोचणार – दत्ता पोळ 

एमपीसी न्यूज – भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण पुण्यात चार वाजेपर्यंत पोहचणार असून पुण्यातील सभेबाबत आम्ही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सभेच्या परवनगी बाबत थोड्याच वेळात निर्णय येईल. आम्हाला परवनगी मिळेल असा विश्वास भीम आर्मी संघटनेचे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी व्यक्त केला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी दत्ता पोळ म्हणाले की, चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे शुक्रवार पासून महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. मात्र त्यांना नजरकैदेत ठेवून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम या सरकारने केले आहे. प्रत्येक व्यक्तीला भूमिका मांडण्याचा अधिकार असून , त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात त्यांचा कार्यक्रम घेतला. मुंबईत कार्यक्रम होऊ दिला. पण आम्ही पुण्यात कार्यक्रम घेणार असून आता चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे दुपारी 4 वाजेपर्यंत पुण्यात पोहचतील. तसेच ठरलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम होईल. तसेच उद्या कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यास देखील जातील. असे त्यांनी सांगितले.

चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे मुंबई येथून पुण्याकडे निघाले असल्याची माहिती मिळताच , पुण्यातील हॉटेल सागर प्लाझा येथे थांबण्याच्या ठिकाणी हॉटेल परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.