Pune : व्यायामामुळे आवाहने पेलण्याची ताकद मिळते- चंदू बोर्डे

दि पूना गुजराती केळवणी मंडळाचा उपक्रम

एमपीसी न्यूज- ‘मुलांनी रोज मैदानात खेळायला पाहिजे, घाम गाळला तरच आरोग्य चांगले राहते, व्यायाम आजच्या युगात खूप महत्वाचे आहे. व्यायामामुळे आवाहने पेलण्याची ताकद मिळते. पालकांनी मुलांच्या शारीरिक प्रगती आणि आहाराकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी केले.

निमित्त होते ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळ’ द्वारा संचालित ‘शेठ आर.एन. शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल’, ‘डॉ. जी.जी शहा इंग्लिश मीडियम हायस्कूल’ आणि ‘आर.सी.एम.गुजराती व शेठ हकमचंद ईश्वरदास गुजराती शाळा’ च्या 600 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सांघिक क्रीडा प्रात्यक्षिक सादरीकरणाचे.

याप्रसंगी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक दीपक माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव जनक शहा, हेमंत मणियार, सहसचिव प्रमोद शहा, मोहन गुजराथी, वरजेश शहा, नीलेश शहा, एच.व्ही.देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. गिरीश पाठाडे, डॉ. गुगळे, सोनल बारोट उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा दिन निमित्त शाळेच्या इयत्ता 3 री ते 10वीच्या विद्दयार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा प्रेम, सांघिक भावना, चिकाटी आणि जिद्द निर्माण करण्याच्या प्रमुख हेतूने 2014-15 पासून गेली 5 वर्षे संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त डॉ. नलिनी गुजराती, अध्यक्ष किरीट शहा यांनी दिली.

प्रात्यक्षिक सादरीकरणात मल्लखांब, सूर्यनमस्कार, रिदमीक योगा, डंबल ड्रिल, सायकलवरील कवायती, मानवी मनोरे, बांबू व फिटनेस ड्रिल आणि जाळातून विविध चित्तथरारक कवायती यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या शाळेच्या खेळांडूचा गौरव प्रमुख पाहुणे पद्मभूषण चंदू बोर्डे, दीपक माने यांच्या हस्ते पदक व प्रशास्तिपत्रक देऊन करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेश कानाबर, अशोक शहा, अनुज गांधी, अध्यक्ष किरीट शहा व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मुख्याध्यापिका अर्चना धारू, पर्यवेक्षिका मंजिरी गुमास्ते व नीलम लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी निजामपूरकर, सोनाली पाटील, विधी नागदेव यांनी केले. तर अर्चना धारू यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.