Pune : व्हायोलिन समवेत रंगली सुगम संगीत, चित्रपट संगीताची सुरेल मैफल !

एमपीसी न्यूज- व्हायोलिनच्या सुरावटी मधून एकापेक्षा एक सरस भावगीते, नाट्यगीते, चित्रपट गीतांनी चारुशीला गोसावी प्रस्तुत ‘ व्हायोलीन गाते तेव्हा ‘ ही मैफल संस्मरणीय ठरली. ‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ही मैफल आयोजित करण्यात आली होती.

‘निज रुप दाखवा ‘ या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. ‘थकलेले रे नंदलाला ‘, ‘धुंद मधुमती ‘, ‘ कशी करू स्वागता ‘, ‘ असा बेभान हा वारा ‘,ही गीते ‘ गुंतता हृदय हे ‘ , ‘ विकल मन ‘ सारखी नाटयपदे ,’ का हो धरिला मजवरी राग ‘, ” बुगडी माझी ‘ सारख्या लावण्या सादर करण्यात आल्या.

हिंदीतील ‘ आईए मेहरबान ‘,’ निगाहे मिलाने को ‘,’ मधूबन में राधिका ‘ सारखी अवीट चालीची गीते व्हायोलिनच्या सुरावटीमधून सादर करण्यात आली.

त्यांना डॉ. राजेंद्र दूरकर यांनी तबल्यावर, अमृता ठाकूरदेसाई यांनी सिंथेसायझरवर तर राजेंद्र साळुंके यांनी ताल वाद्यद्वारे साथसंगत केली. राजेंद्र गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

भारतीय विद्या भवन ‘ चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.