Pune : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग, दुसऱ्याशी लग्न केल्यास ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : एकतर्फी प्रेमातून सलग चार वर्षांपासून (Pune) तरुणीचा वारंवार पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम आणि मोबाईलवर मॅसेज करून त्रास दिला. तसेच, या तरुणीला दुसऱ्याशी लग्न केल्यास त्याला मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एका तरुणावर गुन्हा नोंद केला आहे.

Talegaon Dabhade : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याबद्दल तळेगाव शहर काँग्रेस कमिटीकडून निषेध

2018 ते मार्च 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तरुणी व आरोपी ओळखतात. तो 2018 पासून तिचा पाठलाग करत होता. पण, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. तरीही तो इन्स्टाग्रामवर मॅसेज करत असे. तसेच, तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगत तरुणीला दुसऱ्याशी लग्न केले तर (Pune) त्याला मी मारेल अशी धमकीही दिली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.