Pune : वाहनांची परस्पर विक्री करून सात जणांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कार भाड्याने दिल्याचे सांगून कारची परस्पर विक्री करून सात जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सागर चव्हाण (वय 31 रा. रेठरे, कराड) यांनी फिर्याद दिली आहे. हितेश बिपिन पारेख (रा. कामोठे पनवेल) व जयदीप प्रकाश कुलकर्णी रा. धनकवडी अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश आणि जयदीप यांनी फिर्यादी सागर यांची टाटा इंडिका व्हिस्टा कार आणि त्यांच्या गावातील इतर सहा इसमांची चारचाकी वाहने त्यांच्याकडून घेतली. एका शासकीय कंपनीमध्ये भाड्याने दिल्याचे सांगून ती वाहने परस्पर विकली. दोघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.