Pune : मुख्यमंत्रीसाहेब, मला तुमच्याशी बोलायचंय; भर सभेत महिलेच्या प्रश्नाने पोलिसांची तारांबळ

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगावशेरी येथे सभा घेण्यात आली. यावेळी एका महिलेने अचानक मुख्यमंत्र्यांना ‘मला तुमच्याशी बोलायचंय’ असा प्रश्न विचारल्याने एक तारांबळ झाली. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहताच समोरील बाजूस नागरिकांमध्ये बसलेली एक महिला उठून सोबत आणलेले माईकच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री साहेब तुमच्याशी बोलायचंय आहे’, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सभा होताच तुमच्याशी बोलतो. हे बोलल्यावर संबधित महिला खाली बसली. मात्र, अचानक महिला उठून बोलण्यास सुरुवात झाल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगावशेरी येथे सभा पार पडली. यावेळी पुणे शहराचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार बाबुराव पाचर्णे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like