Pune : मुख्यमंत्र्यांकडून महापौर मोहोळ यांच्या तब्बेतीची विचारपूस; फिल्डवरील कामाचे केले कौतुक

Chief Minister inquires about Mayor Mohol's condition; Appreciate the work done on the field :

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करुन तब्बेतीची विचारपूस केली. तसेच स्वतःची योग्य काळजी घेऊन लवकर कोरोनामुक्त होण्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या. कोरोनाच्या संकटात फील्डवर काम करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापौरांचे कौतुकही केले.

पुणे शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून महापौर जास्तीत जास्त फिल्डवर काम करून पुणेकरांची काळजी घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम सुरू होते. त्यातूनच महापौरांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या विषाणूची बाधा झाली. त्यामुळे पुणेकरांनीही हळहळ व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा महापौर कोरोना काळात चांगले काम करीत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देखतच म्हटले होते.

महापौरांना कोरोना झाल्याची बातमी पुणे शहरात वाऱ्यासारखी पसरली. खुद्द महापौरांनीच ट्विट करून आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले होते.

नुकत्याच झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी पुणेकरांना कोरोनाच्या संकटातून बरे करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महापौरांना फोन करून तब्बेतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.