Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले स्वागत

एमपीसी न्यूज- पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आलेत. यावेळी लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. मोदींचे स्वागत केल्यानंतर मुख्यामंत्री उद्धव ठाकरे मुंबईला तर देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना झाले.

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रोटोकॉलनुसार भेट झाली. यादरम्यान त्यांच्यात काहीसं बोलणंही झाल्याच भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like