Pune : वाचन संस्कृती संवर्धनासाठी बालवाचनालय स्तुत्य उपक्रम – डॉ. सलील कुलकर्णी

एमपीसी न्यूज – वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी फिरते(Pune ) बालवाचनालयाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.

लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी; या उद्देशाने ना. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये ‘फिरते मोफत बालवाचनालय’ सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते अभिनव स्कूल येथे झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अभिनव शाळेचे मुख्याध्यापक (Pune )नंदकुमार नगरकर, उपमुख्याध्यापिका आणेकर, दुपार विभागाचे प्रमुख भालेराव सर, सावंत मॅडम, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड दक्षिण मंडलाचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, कोथरूड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकार, सरचिटणीस प्रा. अनुराधा येडके, दिपक पवार, विवेक मेथा, प्रभाग अध्यक्षा अँड. प्राची बगाटे, स्थानिक नगरसेवक माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, दिपक पोटे, अमोल डांगे, दत्ता भगत, कुणाल तोंडे, दिनेश माथवड आदी मान्यवर उपस्थित होते.

Chinchwad : गीता मंदिर प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

यावेळी डॉ सलील कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लहानपणातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “बाल वय हे अतिशय संवेदनशील आणि संस्कारक्षम असते.

लहान वयातच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे साहित्य, थोर व्यक्तींचे ग्रंथ, जीवनचरित्र वाचायला मिळाले, तर त्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडतात. त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळते. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी फिरते बालवाचनालय हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांनी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. सचिन पाषाणकार यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा.अनुराधा येडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दरम्यान, यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी मुलांच्या आग्रहास्तव त्यांनी त्यांची खास गाजलेली गाणी ” अग्गोबाई-धग्गोबाई, दमलेला बाबा, एका माकडाने टाकलंय दुकान’ मुलांसमवेत गायली. या कार्यक्रमानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप देखील करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.