Pune : विमानात उलटी केल्यामुळे चिनी प्रवाशाला नायडू रुग्णालयात हलवले ; प्रवाशांमध्ये घबराट

एमपीसी न्यूज- दिल्लीहून पुण्याला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये चीनचा नागरिक असलेल्या एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याने उलट्या केल्या. करोना आजाराचा धोका ओळखून हे विमान पुणे विमानतळावर आल्यानंतर या प्रवाशाला त्वरित नायडू रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ली सियोन असे या प्रवाशाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट उडाली.

दिल्लीहून पुण्याला निघालेले एअर इंडियाचे विमान पुणे विमानतळावर आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी उतरले. या विमानांमधून ली सियोन हा चिनी प्रवासी प्रवास करीत होता. विमान प्रवासामध्ये त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याने विमानामध्ये उलटी केली. या घटनेमुळे प्रविष्ट घबराट उडाली. विमान पुण्यात पोहोचताच या प्रवाशाला नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

हे विमान परत दिल्लीला जाणार होते. परंतु विमानाची स्वच्छता करण्यास उशीर झाल्यामुळे विमान सुटण्यास विलंब झाला. विलंब का होतोय याची चौकशी प्रवाशांनी केली असता हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान, नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला चीनी प्रवासी मागील एक महिन्यापासून दिल्लीत असल्याचा दावा करतोय.

या रुग्णाचे नमुने (Swab) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तो सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.