Pune : वंचित मुलांबरोबर नाताळ सण साजरा

एमपीसी न्यूज- पुण्यातील नूतन बाल शिक्षण संघ संचालित स्वारगेट येथील आदर्श बाल मंदिर येथील वंचित घटकांमधील मुलांबरोबर रमा क्रिएशन्सतर्फे नाताळ सण साजरा करण्यात आला.

या संस्थेमध्ये तळागाळातील वंचित मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या 3 ते 12 वयोगटातील पन्नासहून अधिक मुले मुली इथे शिक्षण घेत आहेत. नाताळ निमित्ताने रमा क्रिएशन्स तर्फे या मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी मुलांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी रमा क्रिएशन्सच्या अमृता कानविंदे, रमा कानविंदे, नीला रोडे, स्मिता बिडकर, वृषाली तिखे, शाळेच्या मुख्याध्यापिका अपेक्षा भालेराव तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.