Pune – शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सवाची शोभायात्रा

एमपीसी न्यूज – शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सव देखाव्याची शोभायात्रा तसेच बेस्ट सॅन्टा क्लाज स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनच्या पीटर डिक्रूज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रभू येथू ख्रिस्तचा जन्मोत्सव देखावा हा आपल्या चारचाकी वाहनातून सजावट करून आणून या शोभेयात्रेत स्पर्धकांनी सहभागी व्हायचे आहे. शनिवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सेंट पॅट्रिक्स चर्च येथील बिशप हाऊसपासून ही शोभायात्रा सुरू होणार आहे, असे सांगून डिक्रूज म्हणाले की या स्पर्धेमध्ये सर्वधर्मीय बांधव सहभागी होऊ शकतात. तसेच प्रभू येथूची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धाही यावेळी आयोजीत करण्यात आली आहे.


महात्मा गांधी रस्त्यावर वेगवेगळ्या चर्चेसमधील भाविक, तरुण-तरुणी नाताळची गाणी गाणार आहेत. बेस्ट सॅन्टा स्पर्धा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव देखाव्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ८९२८७८५३०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डिक्रूज यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.