Pune : पीएमपीएल च्या पर्यटन बससेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) ने सुरु केलेल्या पर्यटन ( Pune) बससेवेला हौशी पर्यकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रविवार दि. 21 मे 2023 रोजी पर्यटन बससेवा क्र. 4 या बसचा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन आधिकारी चंद्रकांत वरपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे स्टेशन डेपोचे मॅनेजर संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमपीएलच्या पुणे स्टेशन बस स्थानक येथे वातानुकूलित ई-बसला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्रमांक 4 चा शुभारंभ करण्यात आला.

Chikhali : शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा 

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थाळांकरिता 7 पर्यटन बस मार्ग निश्रित केले असून वातानुकूलीत ई- बसेसव्दारे विशेष पर्यटन बस सेवा प्रत्येक आठवडयाच्या शनिवार , रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दि. 1 मे 2023 पासून सुरु करण्यात आलेले आहे. या पर्यटन बस सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर 500 रु इतका आहे.

पर्यटक बससेवा क्रमांक 4 हौशी पर्यटकांना खडकवासाला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण या धरणाची सफर करण्यात येते. पीएमपीएलने सुरु केलेल्या पर्यटन बससेवेची बुकींग हि डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपाभवन या केंद्रांवर करता येणार ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.