Pune: नागरिकांनो घरपोच औषधे हवीत, ‘या’ नंबरवर संपर्क साधा

साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी घरपोच औषधे पुरविणार

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. नागरिकांची हीच अडचण समजून घेत औंध येथील साई श्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी यांनी घरपोच औषधे देण्याचा निर्णय घेतला आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, पिंपळेगुरव, सौदागर, पिंपळे निलख या भागातील रहिवाशांच्या औषधांच्या गरजा या मोहिमेअंतर्गत भागविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना 7030479885 या क्रमांकावर संपर्क साधून कोणती औषधे हवी आहेत हे सांगावे लागणार आहेत.

कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे भारतभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे घरात असलेल्या लोकांची औषधाची गरज लक्षात घेता औंध येथील साई श्री हॉस्पिटलने घरपोच औषधे पोहचवण्याची मोहिम हाती घेतली आहे. ही सुविधा औंधपासून 10 किलो मिटरच्या परिसरातील लोकांना मिळणार आहे.

साई श्री हॉस्पिटलचे मेडिकल स्टोअर 24 बाय 7 तास कार्यरत आहे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या औषधांची गरज पूर्ण करू शकेल. आपल्याला फक्त 7030479885 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला कोणती औषधे हवी आहेत हे सांगायचे आहे.

 

कोविड 19 या आजाराने संपूर्ण जगाला ग्रासले असून हा विषाणू हवेतून व स्पर्शाच्या माध्यमातून संक्रमित होतो. यावर सर्वात महत्वाची बाब म्हणजे घराबाहेर न जाणे होय. या संकट परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही फक्त घरी रहा सुरक्षित रहा. आम्ही, आपल्याया वैद्यकीय स्वरूपात शक्य तेवढी मदत करू. ‘डॉ. नीरज आडकर : संचालक आणि सांधेरोपणतज्ञ, साई श्री हॉस्पिटल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.