Pune: लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे: डॉ. रमण गंगाखेडकर 

Pune: Citizens should cooperate during lockdown period: Dr. Raman Gangakhedkar

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात पुणे-मुंबई येथे कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नामवंत शास्त्रज्ञ व  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) उपसंचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.

शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा. लॉकडाऊन मोडणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत. यासाठी प्रत्येकाने साथ देवून पुढाकार घेऊन स्वत:ला ‘कोरोना योध्दे’ समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, असेही डॉ. गंगाखेडकर म्हणाले.

दरम्यान, पुुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरुवातीला 5 अत्यंत कडक लॉकडाऊन असणार असल्याचे सांगितले. कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like