Pune : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी उपाययोजना करणार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील नागरिकांना किफायतशीर आणि दर्जेदार आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्‍वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिले.

खडकी परिसरात बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार फेरीची सांगता व निवडणूक मध्यवर्ती कचेरीचे उद्घाटन करताना गिरीश बापट बोलत होते. शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • यावेळी गिरीश बापट म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत शहराचे आरोग्य सलाईनवर होते. आरोग्य व्यवस्थेला लालङ्गितीच्या कारभाराचा मोठा फटका बसला. शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी औंध जिल्हा रूग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्याल उभारण्यात येणार आहे. बिबवेवाडी येथे ससूनच्या धर्तीवर ५०० खाटांचे रूग्णालय उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

महापालिकेच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालाच्या निर्मितीला वेग आला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शहरातील एक लाख ३१ हजार कुटुंबांना पाच लाख रूपयांपर्यंतचे उपचार मोङ्गत होणार आहेत. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आजारपणातील उपचारांच्या आर्थिक विवंचनेतून मुक्त होणार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.