_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर

Citizens with corona symptoms should undergo health check-up: Dr. Deepak Mhaisekar

एमपीसी न्यूज – ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.

तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.  म्हैसेकर यांनी केले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच काही ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे.

आतापर्यत सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत, यापुढेही लॉकडाऊन कडक पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड, रुणवाहिका व आरोग्यविषयक  अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

हेल्पलाईन क्रमांक – 1) तपासणीसाठी डॉ. एन. बी.गोखले- 9422534721/8999951242

_MPC_DIR_MPU_II

2) कोविड माहिती – 1075 ( केंद्र),104 ( राज्य) किंवा राज्य आरोग्य विभाग (020-26127394)

3) नॉन कोविड आरोग्य ( कोमार्बिड) तातडीचे ( 24×7) डी एम सी सेल – पुणे मनपा (020-25506800, 25506801, 25506802,25506803)

4) कोविड लक्षणे / गृह विलगीकरण/ रुग्णालय प्रवेशाकरीता (24×7)-डी.एम.सी सेल – पुणे मनपा (020- 25506800, 25506801, 25506802, 25506803 किंवा 020- 25506300 (नायडू रुग्णालय).

5) रुग्णवाहिका प्रसुती रुग्णांकरीता – कमला नेहरु रुग्णालय- (020-25508500, 25508609, सोनवणे रुग्णालय – (020-25506100, 25506108) 6) नॉन कोविड रुग्णांकरीता रुग्णवाहीका – 108 ( शासकीय) किंवा 101 पुणे मनपा

7) कोविड रुग्णवाहिका – 108 ( शासकीय) 8) नॉन कोविड शववाहिका – 101 पुणे मनपा 9) कोविड शववाहिका – व्हेईकल डेपो – 020-24503211,24503212

बेड उपलब्धतेकरीता – https://www.divcommpunecovid.com/ccsbedddashboard/hsr
इतर तातडीच्या कामाकरीता पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020-25506800 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ.  म्हैसेकर यांनी केले आहे.

तसेच गुगल ॲप वरुन कोविड केअर ॲप डाऊनलोड केल्यास बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती जाणून घेऊ शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.