Pune : शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पाणी येत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी

एमपीसी न्यूज – शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यावर मध्यवर्ती पेठांमध्ये पिण्याचे पाणी येत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केल्या.

24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेसाठी 15 टक्के पाणीपट्टी वाढविण्यात आली आहे. मात्र, पेठांमध्ये पाणीच येत नसल्याचे काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले. पुढील 3 वर्षे पाणीपट्टी वाढविण्याला विरोध असल्याचे काँगेसतर्फे सांगण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

आमचा चढ – उताराचा भैगोलिक भाग आहे. पाणीपट्टी वाढवून देणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम म्हणाले. आमच्या भागात महापालिकेची शाळा नाही. सामान्य नागरिक 1 कोटी ते 50 लाख रुपये किमतीचा फ्लॅट घेऊ शकत नाही. पाणी साचवायला टाक्या नाहीत. तसेच, पिसोळी, न-हे ही गावे मधली तशीच ठेवण्यात आली आहेत. ही गावे तातडीने पुणे महापालिकेत घेण्यात यावी, अशीही मागणी प्रकाश कदम यांनी केली.

महात्मा फुले यांनी जिथे स्वतः ची विहीर उपलब्ध करून दिली. त्या गंजपेठ भागात पाणी येत नसल्याची तक्रार स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर यांनी केली. पाण्यासाठी नागरिकांची सातत्याने विचारणा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.