Pune City Crime News:- बाप रे ! बस प्रवासात ओळख झालेल्या महिलेने चार महिन्याचे बाळ पळवले

22 वर्षीय महिलेचा शोध सुरु

एमपीसीन्यूज : अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेने चार महिन्यांच्या बाळाचं अपहरण केले. हडपसर परिसरात हा प्रकार घडला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करतात आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे. 23 वर्षीय महिलेने या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने चार महिन्याचा बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणी गावातील ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला.

त्याचवेळी बस प्रवासात एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या.

स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही.

बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला. अद्याप तिचा शोध लागला नसून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.