Pune City Crime News : लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावून तिच्या अंगावर ॲसिड सदृश्य पदार्थ फेकला

एमपीसीन्यूज : दत्तवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावून एका तरुणाने तिच्याशी वाद घालत तिच्या अंगावर ॲसिड सदृश्य पदार्थ फेकला. पर्वती दर्शन परिसरात सोमवारी ही घटना घडली. जखमी झालेल्या विवाहितेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अबुजर आय्याज तांबोळी याला अटक केली आहे. 18 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी या तरुणीचा विवाह झाला होता.

काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली असताना आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. यावेळी फिर्यादीने आता माझे लग्न झाले आहे. माझ्या मागे नको लागूस, असे त्याला सांगितले. परंतु, रागावलेल्या आरोपीने तिच्या अंगावर ॲसिड सारखा पदार्थ टाकला आणि पळ काढला.

यामध्ये फिर्यादी विवाहिता गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटकही करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.