Pune City Crime News : धायरीत बंद फ्लॅट फोडून 14 लाखाचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत धायरी येथे जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद असलेला फ्लॅट फोडून तब्बल 14 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी विजय गोखले (वय 60) यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय गोखले हे धायरी परिसरात राहतात. 17 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत फिर्यादी फ्लॅट कुलूप बंद करून बाहेर गेले होते. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते घरी परत आले असता त्यांना फ्लॅटचे कुलूप तोडलेले दिसले.

त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील तब्बल 14 लाख 42 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. टी. जाधव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.