Pune City Crime News : तडीपार असतानाही शहरात फिरणारा सराईत जेरबंद

एमपीसीन्यूज : पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार असतानाही शहरातील कासेवाडी भागात बिनधास्त फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

विनायक बंडू कराळे (वय 22 वर्ष, रा. कासेवाडी, पुणे) असे या सराईत गुन्हेगारांची नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विनायक कराळे हा कासेवाडीतील अशोक चौकात उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कासेवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशी त्याने विनायक कराळे नाव असल्याचे सांगितले. तो खडक पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाला. त्याच्याविरुद्ध खडक पोलीस स्टेशन मध्ये तब्बल 18 गुन्ह्याची नोंद आहे.

त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार ही करण्यात आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून तो पुणे शहरात बिनधास्त फिरत होता.

खडक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस कर्मचारी अमोल पवार, इम्रान शेख , तुषार माळवदकर, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.