Pune City Crime News:- कासवांची तस्करी करणारे दोघे गणेश पेठेतून ताब्यात

एमपीसीन्यूज : वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील गणेश पेठेत कासव तस्करीचा डाव हाणून पाडला. वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून स्टार प्रजातीची 20 कासवं आणि ब्लॅक स्पॉटेड पाँड टरटेल प्रजातीची 10 कासवं जप्त करण्यात आली आहेत.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गणेश पेठे येथे दोघेजण कासव विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पथक तयार करून या दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या एका पुठठ्याच्या बॉक्समध्ये तीस कासवं आढळली.

आरोपींनी ही कासवं कुठून आणली होती. त्याची विक्री ते कोणाला करणार होते, याचा तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.