Pune : पुणे रेल्वे स्थानकात पोलिसांवर फायरींग; दिवसभरात फायरींग सत्र सुरुच शहरात खळबळ

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्थानकात गुन्हे शाखेच्या पोलिसावरच फायरींग करण्यात आली आहे. पुण्यात दिवसभरात फायरींग झाल्याची ही दिवसभरातील तिसरी घटना आहे. या फायरींगमुळे शहरात खळबळ माजली आहे. ही घटना आज बुधवारी (दि.२१) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन पवार जखमी झालेल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुणे पोलीस करत आहे. चंदननगर फायरिंग मधील आरोपी झेलम एक्क्सप्रेसने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले होते. पकडण्याचा प्रयत्न करताना एकाने गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या पोटात लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.