Pune : शहराला व्हेंटीलेटरसह आवश्यक औषधांचा साठा मिळावा : शिवसेनेची मुख्यमंत्रांकडे मागणी

City should get stock of essential medicines including ventilator: Shiv Sena's demand to CM : पुणे शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेला राज्य शासनातर्फे व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन टेसिलिझुमॅब, रॅमिडिसीविरची मदत मिळावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक संजय भोसले, विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, नाना भानगिरे, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, श्वेता चव्हाण, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे उपस्थित होते.

कोरोनाच्या संकट काळात व्हेंटिलेटर, औषधे तसेच इंजेक्शनाचा पुणे शहरात तुटवडा आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी ही मदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सन 2006 पासून राज्य शासनाच्या प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत नर्स, ऑक्झिनरी नर्स, ज्युनियर नर्स, क्लार्क, शिफाई व इतर असे एकूण 75 ते 80 कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करीत आहेत. त्यांना कायम करण्याबाबत राज्य शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणीही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.